‘कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हतीच’

‘कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हतीच’

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हतीच, ही मागणी आमच्यावर लादण्यात आली; असे किशोर चव्हाण म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक किशोर चव्हाण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या लक्षवेधी कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात मोठा खुलासा केला.

मराठा समाजातील सर्व नागरिकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याआधी एक मोठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागते. ही प्रक्रिया बिलकूल राबवू नये अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे आरक्षणाची मराठा समाजाची मागणी कायद्याच्या चौकटीत कशी टिकणार असा प्रश्न जाणकार विचारू लागले. याच संदर्भात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या लक्षवेधी या कार्यक्रमात चर्चा झाली. या चर्चेत बोलताना कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हतीच, ही मागणी आमच्यावर लादण्यात आली; असे किशोर चव्हाण म्हणाले. जरांगे पाटील यांचे समर्थक असलेल्या किशोर चव्हाण यांनी हा खुलासा केल्यामुळे मराठा आंदोलनामागे सत्तेत नसलेली राजकीय शक्ती असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

‘कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हतीच’
‘ही मागणी आमच्यावर लादण्यात आली’
लक्षवेधी कार्यक्रमात किशोर चव्हाणांचा मोठा खुलासा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version