संभाजीनगरात आगार सायगाव परिसरात अपघात

संभाजीनगरात आगार सायगाव परिसरात अपघात

छत्रपती संभाजीनगर, १५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यात काही लहान मुलांचादेखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला असल्याचे कळत आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. रात्री एक ते दीडच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाचे मुद्दे –

ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३० जण प्रवास करत होते
मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश…
स्थानिक आले मदतीला धावून…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version