पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

मुंबई, , १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताने पाकिस्तान विरुद्धचा विश्वचषकातील साखळी सामना सात गडी राखून जिंकला. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे ट्वीट करून अभिनंदन केले.

अहमदाबादमध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान साखळी सामन्यात पाकिस्तानने ४२.५ षटकांत सर्वबाद १९१ धावा केल्या. भारताने ३०.३ षटकांत तीन बाद १९२ धावा केल्या. या सामन्यात सात षटकांत १९ धावा देत दोन गडी बाद करणारा भारताचा जसप्रीत बुमराह सामनावीर झाला.

भारताने यंदाच्या विश्वचषकातील सलग तीन साखळी सामने जिंकले. या कामगिरीमुळे भारत यंदाच्या विश्वचषकातील गुण तालिकेत थेट पहिल्या स्थानावर पोहोचला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version