मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

जालना, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : जालन्याच्या आंतरवाली सराटीममध्ये मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजानं गर्दी केली होती. या सभेत मराठ्यांसाठी आरक्षण मागत असतानाच जरांगेंनी राजकारण्यांवर आरोप करत त्यांची पोलखोलही केली आहे.

या विराट सभेतून मनोज जरांगेंनी सरकारला शेवटचं अल्टिमेटम दिलं. तसेच, जरांगेंच्या सभेवर टीका करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. मराठा समाजाला उसकवा, असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि सदावर्ते यांना सांगितल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. याशिवाय सरकारनं आपलं फेसबुक अकाउंटही बंद केल्याचा आरोप जरांगेंनी भर सभेत केला आहे. एवढंच नाहीतर सात कोटींची जमीन घेतल्याचा आरोप करणाऱ्या भुजबळांना जरांगेंनी भर सभेत हिशोब देत त्यांच्यावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील ?
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात आग ओकायचं कमी केले पाहिजे. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे फडणवीसांनी गुणरत्न सदावर्ते यांना समज द्यावी. मराठ्यांना अंगावर घेऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते शनिवारी अंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

केंद्र आणि राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुमच्या विजयानंतर ट्रक दिल्लीपर्यंत आणून तुमच्यावर गुलाल उधळतील, असेही जरांगे-पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने येत्या १० दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा २२ ऑक्टोबरला तुम्हाला काय करायचं हे सांगू. आपल्याला पुढील आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच करायचे आहे. याच मार्गाने मराठा समाज आरक्षण मिळवेल, हा शब्द आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

महत्वाचे मुद्दे –

‘ते जनतेचे पैसे खातंय, वावर विकत घेतंय’
‘ज्या मराठ्यांनी मोठं केलं, त्यांचेच पैसे खाल्ले’
मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना सुनावलं

‘सदावर्ते यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं’
‘फडणवीसांनी सदावर्ते यांना समज द्यावी’
‘मला अटक करणं सोपं नाही’
जरांगेंच्या निशाण्यावर गुणरत्न सदावर्ते

‘भुजबळ, सदावर्तेंना मराठ्यांना उकसवायला सांगितलं’
‘मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळ, सदावर्तेंना सांगितलं’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version