मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना दसरा मेळाव्याची तयारी करत आहे. दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावे म्हणून शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत ओव्हल मैदानावर होणार आहे, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. याआधी उद्धव गटाने शिवाजी पार्क मैदान सभेसाठी आम्हालाच मिळावे अशी मागणी जाहीरपणे केली होती. जर त्यांचा आणि आमचा असे दोन अर्ज असतील तर शिवाजी पार्कसाठी आम्हाला प्राधान्य द्यावे, अशीही उद्धव गटाची मागणी होती. पण केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर कोणाची सभा हा प्रश्नच उरला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.
केसरकर यांनी दिलेली महत्त्वाची माहिती
‘कुणाच्या चिन्हावर कोण उभं राहणार हे महत्वाचं नाही’
‘मोदींना निवडून आणणे हा एकच उद्देश’
दीपक केसरकरांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?
‘शिवसेनेचा मेळावा ओव्हल मैदानावर होणार’
मंत्री दीपक केसरकरांची माहिती
उद्धव गटासाठी शिवाजी पार्कचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.