तुळजापूर, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यांवर आक्षेप घेत पुजारी आक्रमक झाले आहेत. प्रस्तावित विकास आराखड्यात दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास पुजारी, व्यापारी, स्थानिक यांचा विरोध आहे. या विरोधाची प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी बुधवार ११ ऑक्टोबर रोजी पुजारी आणि व्यापारी यांनी तुळजापूर बंदची हाक दिली आहे.
सध्या तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू आहे. पंचांगानुसार रविवार १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. याआधीच तुळजाभवानी मंदिरात वादाला तोंड फुटले आहे.
विकास आराखड्यानुसार काय बदल होणार ?
वातानुकुलित सभागृहातून दर्शनाची रांग असणार
दहा वातानुकुलित सभागृहांमध्ये एक लाख भाविकांना सामावून घेण्याची क्षमता
एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने भाविकांना गाभाऱ्यात दर्शनासाठी पाठवणार
दर्शनाला अंदाजे किती वेळ लागणार हे आधी कळणार
वाहन तळावर काउंटर पासची व्यवस्था
भाविकांना मंदिर परिसरात तासभर आधी प्रवेश
मंदिर परिसरातील बांधकामात बदल होणार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.