मनसेचे पनवेल टोलनाक्यावर आंदोलन

मनसेचे पनवेल टोलनाक्यावर आंदोलन

पनवेल, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पनवेल टोल नाक्यावर मनसेने आंदोलन केले आणि टोल वसुलीला कडाडून विरोध केला. मुंबई पुणे महामार्गावर शेडुंग टोलनाक्याजवळही आंदोलन केले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण महाराष्ट्रामधील छोटी वाहने टोल मुक्त असल्याचं विधान केले होते. यानंतर २४ तासांच्या आत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आणि टोलनाक्यांवर आंदोलन केले. याआधी फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्र हा टोलमुक्त झालाच पाहिजे अशी भूमिका राज यांनी घेतली. राज्यात छोट्या वाहनांवर टोल आकारला जात असेल तर मनसे त्याला विरोध करेल असेही राज म्हणाले. यांनतर मनसेने टोल विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले.

मनसे कार्यकर्ते वाशी टोल नाक्यावर

टोल नाकावर विना टोल गाड्या सोडण्याचा प्रयत्न

कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ऐरोली टोलनाक्यावर मनसे कार्यकर्ते

मनसे कार्यकर्त्यांनी चार चाकी वाहनाना सोडले मोफत

पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version