मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: विधानसभा निवडणुका जवळ आल्याने कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सुरू केलं आहे. तुम्ही हरला तर पावती माझ्या नावावर फाटेल. पण मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
जळगाव शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले. जिल्हा परिषद, पंचायत समिती सुद्धा ताकदीने लढू असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या. जळगाव ग्रामीण मतदार संघात ३२ पैकी २५ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवा. तुम्ही हरले तर त्याची पावती माझ्या नावावर फाटेल. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत जर मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ तुटतील, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.