‘फडणवीस राजकारणातील खोटारडा माणूस’

‘फडणवीस राजकारणातील खोटारडा माणूस’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःचा अपमान स्वतःच करत आहेत. ज्याप्रमाणे दिल्लीचे त्यांचे मातेरे व पोतेरे केले ते पाहून आम्हाला त्यांची लाज वाटते. त्यांच्यासारखा खोटारडा माणूस आम्ही पाहिलाच नाही, अशा तिखट शब्दांत उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस आणि भाजपवर चांगलीच सडकून टीका केली आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस राजकारणात मी केव्हाही पाहिला नाही. हे दुर्दैवाने मला म्हणावे लागत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशी विधाने करायची. यापलिकडे त्यांनी गत दीड वर्षांत काहीच केले नाही. कधी उद्धव ठाकरे, कधी शरद पवार यांच्या प्रतिमेला तडे जातील असे ते बोलतात.’ त्यांनी गत वर्षभरात काय केले हे सांगावे, असे संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version