आप खासदार संजय सिंह यांना अटक

आप खासदार संजय सिंह यांना अटक

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना दिल्लीतील दारू धोरण प्रकरणाशी संबंधित आर्थिक अफरातफरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने ही कारवाई केली आहे. संजय सिंह यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. दिवसभर तपासणी केल्यानंतर ईडीने संजय सिंह याला अटक केली. याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील दारू धोरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सिसोदिया मार्च २०२३ पासून अटकेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version