‘राऊतांची गुपिते पाटकरने उलगडली’

‘राऊतांची गुपिते पाटकरने उलगडली’

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : कोविड काळात कोट्यवधी रुपयांची कंत्राटे मिळवण्यासाठी सुजीत पाटकरने संजय राऊतांचे नाव वापरले असा उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात आहे,. ही धक्कादायक माहिती भाजपा उपाध्यक्ष डॉ. किरीट सोमय्या यांनी दिली.

संजय राऊत यांचे नाव वापरून सुजीत पाटकरने कोविड काळात ३२ कोटी ६० लाख रुपयांची कंत्राटे मिळवली. या व्यवहारांबाबत संजय राऊतांना कल्पना होती. वर्षा संजय राऊत, सपना सुजित पाटकर यांच्या नावाने पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीन घेण्यात आली. कोविड काळातील एका खिचडीच्या कंत्राटाशी संबंधित व्यवहार विशिष्ट लोकांसोबत करण्यासाठी राऊतची सुपुत्री आणि भावाच्या खात्यात पैसा जमा केला गेला. या नोंदी तपासात ईडीला आढळल्या आहेत. यामुळे ईडीच्या पुढील कायदेशीर कारवाईत या विषयावर संबंधितांना उत्तर द्यावी लागतील. हिशेब सांगावाच लागेल, असे भाजपा उपाध्यक्ष डॉ. किरीट सोमय्या म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version