मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडची बबली गर्ल अर्थात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची सर्वत्र चारही होतीच.अखेर २४ सप्टेंबर २०२३ रोजी राघनितीने लग्नगाठ बांधली. परंतू अद्याप त्यांच्या लग्नाचचे काही फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा त्यांचा विवाह सोहळा उदयपूरमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर नुकताच परिणीतीनं तिच्या लग्नसोहळ्याचा एक खास व्हिडीओ इंस्टग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये वरात, नवरीची एन्ट्री, पाहुण्यांची लगबग दिसून येत आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओला परिणीतीनं खास कॅप्शन देखील दिलं आहे.
परिणीतीनं समाज माध्यमांवर सामायिक केलेल्या व्हिडीओमध्ये तिची लग्नातील एन्ट्री आणि लग्नसोहळ्यातील काही खास क्षण देखील दिसत आहेत. या व्हिडीओला परिणीतीनं कॅप्शन दिलं, “हे माझ्या पतीसाठी… मी गायलेलं गाणं. तुझ्याकडे चालत आले, वरात लपून बघितली, हे गाणे गायले. या सर्व गोष्टींबद्दल मी काय बोलू.. ओ पिया, चल चलें आ”
आता परिणीतीचा हा खास व्हिडिओ पाहून नेटकरी भारावून गेलेत. त्यामुळे तिच्या पोस्टवर चाहत्यांनी सुंदर सुंदर कंमेंट्सचा वर्षाव केलाय. त्याचबरोबर तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्यात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.