पंकजा मुंडेंचा धक्कादायक अनुभव

पंकजा मुंडेंचा धक्कादायक अनुभव

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘मुंबईत मराठी माणसाला घर मिळत नाही… मलाही अनुभव आलाय…’ या शब्दात मुलुंडमधील घटनेवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

केवळ मराठी असल्यामुळे आपल्याला मुंबईत घर नाकारण्यात आलं, असा दावा स्वत: पंकजा मुंडे यांनी केला. मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्यामुळे घर नाकारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गुजराती नागरिकांनी तृप्ती यांना घर नाकारलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपला अनुभव सांगितला. सरकारी घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचं होतं, तेव्हा मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं, अशी धक्कादायक माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version