नड्डांचा मुंबई दौरा

नड्डांचा मुंबई दौरा

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. ते लालबागच्या राजाचे आणि केशवजी नाईक चाळीतील गणपतीचे दर्शन घेणार आहेत. तसेच नड्डा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी असलेल्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. या व्यतिरिक्त नड्डा पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. जे. पी. नड्डा राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version