पवार आणि अदानींमध्ये प्रदीर्घ चर्चा

पवार आणि अदानींमध्ये प्रदीर्घ चर्चा

अहमदाबाद, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मोदी विरोधासाठी राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक नेते एकत्र आले आहेत. पण कॅमेऱ्यासमोर एकत्र दिसणाऱ्या या नेत्यांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजतंय. राहुल गांधी उद्योगपती गौतम अदानींवर गंभीर आरोप करत आहेत. तर शरद पवार अदानींसोबत प्रदीर्घ चर्चा करत आहेत. शनिवारी तर अदानींच्या गुजरातमधील प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवारांनी केले. या कार्यक्रमासाठी शरद पवार गुजरातला गेले होते. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी गुजरातमधील चाचरवाडीतील वसना येथे एक नवा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवारांनी केले. या कार्यक्रमानंतर शरद पवार गौतम अदानी यांच्या निवासस्थानी गेले. दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. पवार – अदानी यांच्यातील या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version