दिल्ली विद्यापीठावर अभाविपचा झेंडा

दिल्ली विद्यापीठावर अभाविपचा झेंडा

दिल्ली विद्यापीठ, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : दिल्ली विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत चार पैकी तीन जागांवर अभाविपचा विजय झाला. एक जागा एनएसयूआयने जिंकली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव या तीन पदांची निवडणूक जिंकली. उपाध्यक्षपदाची निवडणूक भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ अर्थात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या संघटनेने जिंकली. अभाविप ही भारतीय जनता पार्टीची तर एनएसयूआय ही काँग्रेसची विद्यार्थी संघटना आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version