मुंबई, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’च्या सहसंस्थापिका जसवंतीबेन जमनादास पोपट (वय ९३) यांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले. गिरगावातील शंकर बारी लेन येथील ‘हलिया लोहाणा निवास’ या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचे वास्तव्य होते. हजारो महिलांच्या हाताला काम देणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
मार्च १९५९ मध्ये त्यांनी मुंबईमधील गिरगावातील सात महिलांनी सोबत घेऊन ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या पापड तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. सात गृहिणींनी ८० रुपयांच्या भांडवलासह सुरू केलेला पापड उद्योग कोट्यवधी ग्राहकांच्या घरामध्ये पोहचण्यासाठी जसंवतीबेन यांचे मोलाचे योगदान होते. जसवंतीबेन पोपट यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेशी संबधित विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजऋण कायम फेडण्याचा प्रयत्न केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.