नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता व्हॉट्सअॅप चॅनलवर आले आहेत. पंतप्रधान मोदींशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ या व्हॉट्सअॅप चॅनलवर मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सर्व माहिती अतिशय वेगाने आणि विनामूल्य उपलब्ध असेल. यामुळे पंतप्रधान मोदींशी संबंधित अपडेट मिळवणे सोपे होणार आहे. पंतप्रधानांशी संबंधित माहितीवर त्यांच्या चॅनलचे फॉलोअर इमोजींच्या स्वरुपात व्यक्त होऊ शकतील.
पंतप्रधान मोदींच्या व्हॉट्सअॅप चॅनलला कसे फॉलो करता येईल ?
मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप असल्यास ते अपडेट करा.
मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अप टू डेट असल्यास अपडेट या टॅबवर जा आणि व्हॉट्सअॅप चॅनल बघा
काही मोबाईलमध्ये स्टेटस टॅबवर जाऊन स्क्रोल केल्यावर एकदम खाली व्हॉट्सअॅप चॅनल बघता येतात
व्हॉट्सअॅप चॅनलच्या पर्यायात सर्चवर क्लिक करा आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) असे सर्च केल्यावर मोदींचा अधिकृत चॅनल दिसेल.
मोदींचा अधिकृत चॅनल दिसताच तो फॉलो करा आणि पंतप्रधानांशी संबंधित महत्त्वाची ताजी माहिती मिळवा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.