गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

मुंबई, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : गणपतीच्या सजावटीसाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. फुले, फळे, सजावटीचे सामान, मिठाई अशा विविध प्रकारच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन

गणेश चतुर्थी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरू आहे. या धावपळीत सेलिब्रेटी पण मागे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरीही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून शिल्पा शेट्टीच्या घरी गणेश चतुर्थीच्या आधीच गणपतीचे आगमन होते. यंदाही शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी स्वागत केले.

सिद्धिविनायकाचे आगमन

मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात दरवर्षी पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना होते. या मूर्तीच्या आगमनाची लगबग सोमवारी पाहायला मिळाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी न्यासाचे प्रमुख आदेश बांदेकर यांच्या हजेरीत गणेश मूर्ती आणली. यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण अनुभवता आले.

‘सिंधुदुर्गच्या राजा’चे जल्लोषात आगमन

‘सिंधुदुर्गच्या राजा’चे कुडाळ येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. बाप्पाची मिरवणूक बजाज शोरूम ते भाजप कार्यालयपर्यंत काढण्यात आली. सिंधुदुर्ग राजाच यंदाचे हे १४ वे वर्ष आहे. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेली १४ वर्षे केली जात आहे. याही वर्षी डीजेच्या तालावर गणरायाची मिरवणूक काढण्यात आली असून मंगळवारी, १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थित विधिवत गणरायाची पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version