बबनराव घोलप शक्तीप्रदर्शन करणार

बबनराव घोलप शक्तीप्रदर्शन करणार

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवसेना उपनेते बबनराव घोलप मुंबईत सेनाभवन येथे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यासाठी घोलप आणि त्यांचे अनेक समर्थक मुंबईत आहेत. काही दिवसांपूर्वी बबनराव घोलप यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी फेटाळला. पण बबनराव घोलप यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. आता बबनराव घोलप सेनाभवन येथे शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

बबनराव घोलप २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण उद्धव गटाने काही दिवसांपूर्वी माजी खासदार भानुदास वाकचौरे यांना पक्षात प्रवेश दिला. अनेक दिवस शिर्डीचे संपर्कप्रमुख असलेल्या घोलप यांना विश्वासात न घेता उद्धव गटाने शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती केली. यामुळे घोलप नाराज झाले आहेत. त्यांनी शिवसेना उपनेतेपद, शिर्डी संपर्कप्रमुखपद या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version