मुंबई, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कांदिवली पूर्व येथे सरोवा या निवासी संकुलात पाणीपुरवठा अनेकदा अनियमित असतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी पुढाकार घेतला आहे. कांदिवली पूर्वेच्या सरोवा या निवासी संकुलातील अनियमित पाणीपुरवठ्याप्रश्नी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत आमदार सुर्वे यांनी आढावा बैठक घेतली.
सरोवा संकुलात सुमारे दहा हजार जणांची वस्ती आहे. पण या भागात पाणीपुरवठ्याचा गोंधळ आहे. यामुळे नागरिकांना वारंवार पाण्याचा प्रश्न सतावतो. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी या प्रश्नी पुढाकार घेतला. पाणीप्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आयुक्तांशी चर्चा केल्याचे खासदार श्रीकांत शिंद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.