काका – पुतण्या पुन्हा भेटणार ?

काका – पुतण्या पुन्हा भेटणार ?

पुणे, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण आज शरद पवारांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इंस्टीट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत स्थापन केलेली संस्था आहे. ऊस उद्योगाच्या संदर्भात शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. १९ नोव्हेंबर १९७५ ला वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची स्थापना करण्यात आली होती.

शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होत असते. आजही कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक पुण्यातील मांजरी इथे होणार आहे. अजित पवार यांच्यासोबतच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जयंत पाटील आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version