मुंबई, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची आयोगामार्फत सध्या चौकशी सुरू असून, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी (दि. १६) पुन्हा उलटतपासणी होणार आहे. सुनावणीवेळी ते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. या प्रकरणात आणखी काहींची उलटतपासणी घेण्यात येणार असल्याचे कळते.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती. त्यासंदर्भात कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सदस्य निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात शनिवारी प्रकाश आंबेडकर यांच्या उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता आहे, असे त्यांचे वकील ॲड. किरण कदम यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.