ट्विटरवर दादा गट सापडेना

ट्विटरवर दादा गट सापडेना

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : दादा गटाचं ट्विटर खातं निलंबित करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून हे ट्विटर खातं निलंबित आहे. तसा मेसेज देखील दादा गटाच्या ट्विटर हॅण्डलवर दिसत आहे. सुप्रिया गटाने तक्रार केल्यानंतर एक्सकडून (आधीचे ट्विटर) ही कारवाई करण्यात आली. अजित पवार शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपासोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. शिवाय या दोन्ही गटांचे सोशल मीडियावरील अकाऊंट देखील वेगळे आहेत. NCPSpeaks हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अधिकृत ट्विटर हँडल आहे. तर अजित पवार गटाचं अधिकृत ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आलं आहे. NCPSpeaks1 नावाने अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल होते. नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version