आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी

आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ४० आमदारांना तसेच उद्धव गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुनावणीच्यावेळी आमदार त्यांची बाजू मांडतील. ही प्रक्रिया विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडेल, असे समजते. सुनावणी झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version