नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात

नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात

नाशिक, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक मुंबई महामार्गावर लतिफवाडी जवळ भीषण अपघात झाला. पहाटेच्यावेळी हा अपघात झाला. उभ्या असलेल्या आयशरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे ट्रक उलटला. उलटलेल्या ट्रकला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनासह चालक फरार झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आपत्ती व्यवस्थापन टीम, रूट पेट्रोलिंग टीम आणि महामार्ग पोलीस यांनी संयुक्त प्रयत्न करून ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version