देवेंद्र फडणवीस दोषमुक्त

देवेंद्र फडणवीस दोषमुक्त

नागपूर : निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्त झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खासगी स्वरुपाचे होत्या. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याने फडणवीसांना दोषमुक्त करण्यात आलं आहे. या सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाजात सहभागी झाले होते. नागपूरच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयानं शुक्रवारी हा निर्णय दिला. नजरचुकीने माहिती नमूद करणे राहून गेले. पण गुन्हे लपवण्याचा उद्देश नव्हता, असे फडणवीस यांच्यावतीने सांगण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांना दोषमुक्त केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version