नवी दिल्ली : जी २० परिषदेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. राजधानी दिल्लीत सलग तीन दिवस सुट्टी दिली आहे. यामुळे राजधानी दिल्लीतले रस्ते ओस पडले आहेत. चौकाचौकांमध्ये ध्वज लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
जी २० परिषदेसाठी दिल्लीत ५० हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या परिषदेवर ४० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. दिल्लीत येणारे अनेक रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. दिल्लीच्या सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.