नाशिकच्या नूतन मराठी शाळेतली दहीहंडी

नाशिकच्या नूतन मराठी शाळेतली दहीहंडी

नाशिक : श्रीकृष्णाच्या वेषभूषेतील बालगोपाळ..राधाची अदा करणार्‍या चिमुकल्या.. बासरी घेऊन आलेला नटखट कन्हैय्या.. पाच फुटावर बांधलेली दहीहंडी.. गोविंदाच्या तालावर नाचत दहीहंडी फोडण्याचा आनंद.. हे दृश्य आहे इगतपूरी येथील नूतन मराठी शाळेतील चिमुकल्यांची. आज इगतपुरी येथील नूतन मराठी शाळेत दहीहंडी सण साजरा करण्यात आला. अंगणवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी राधा, कृष्ण, गोपिका, सुदामा यांची वेशभूषा परिधान करून या उत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी चित्रकला व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या मुलांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर चिमुकल्यांनी थर रचत दहीहंडी फोडून एकच जल्लोष करत मटकितील प्रसादाचा आनंद लुटला. यावेळी पालकांनी व परिसरातील नागरिकांनी हा उत्सव पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version