नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : सरकारी कागदपत्रांमध्ये ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ आणि ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असे उल्लेख करण्यात आले आहेत. भारत सरकारच्या कागदपत्रांमधील या उल्लेखांवरून देशाचे नाव भारत की इंडिया असा वाद राजकीय वर्तुळात सुरू झाला आहे.
पंतप्रधान मोदी इंडोनेशिया येथे विसाव्या आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्याशी संबंधित सरकारी माहितीपत्रकात ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख आहे. याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून जी २० परिषदेला उपस्थित राहणार असलेल्या राष्ट्रप्रमुखांना रात्रीच्या विशेष भोजनाचे आमंत्रण देण्यात आले. या आमंत्रणासाठी ज्या सरकारी कागदपत्रांचा उपयोग करण्यात आला त्यात सगळीकडे ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख होता. या उल्लेखांवरून राजकीय वर्तुळात वाद सुरू झाला आहे. वादामुळे केंद्र सरकारचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत.
संविधानात इंडिया आणि भारत या दोन्ही शब्दांचा समावेश
देशाच्या संविधानाच्या कलम १.१ मध्ये इंग्रजीत ‘India , that is Bharat, shall be an union of states’ आणि हिंदीत भारत, अर्थात इंडिया, राज्यों का एक संघ होगा असा उल्लेख आहे
महत्त्वाचे मुद्दे
देशाचे नाव बहुमताच्या जोरावर निश्चित करण्यात आले आहे
देशाचे नाव, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत या संदर्भातले निर्णय बहुमताने घेण्यात आले आहेत
भारताच्या संविधानात इंडिया आणि भारत अशा दोन्ही शब्दांचा उल्लेख देशाचे नाव म्हणून करण्यात आला आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.