इसरोच्या प्रश्नांची उत्तरे द्या, एक लाख रुपये जिंका

इसरोच्या प्रश्नांची उत्तरे द्या, एक लाख रुपये जिंका

नवी दिल्ली, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चांद्रयान – ३ चे यश साजरे करण्यासाठी भारत सरकार आणि इसरो यांनी संयुक्तपणे एका प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत अचूक उत्तरे देणाऱ्या विजेत्याला एक हजार ते एक लाख रुपयांचे बक्षिस जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. स्पर्धेची माहिती इसरोने अधिकृत हँडलवरून ट्वीट करून दिली आहे. इच्छुक isroquiz.mygov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाला isroquiz.mygov.in वर जाऊन MyGov वर स्वतःचे खाते तयार करावे लागेल. प्रोफाइलसाठी विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित नमूद करणे आवश्यक आहे. कारण प्रोफाइलमधील माहितीचा उपयोग नंतर विजेत्यांशी संपर्क साधण्यासाठी होणार आहे. स्पर्धक भारतीय मोबाईल नंबर देऊन अथवा वैध ईमेल आयडी वापरून स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version