अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. १७ सप्टेंबर रोजी अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छ्त्रपती संभाजीनगरमध्ये देखील भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अमित शाह महाराष्ट्रात येणार आहेत. अमित शाह मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असून मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकार मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमदेखील आयोजित करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version