मायावती यांनी दिला ‘एकला चलो’चा नारा

मायावती यांनी दिला ‘एकला चलो’चा नारा

लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात मोदी विरोधक पक्षाची बैठक आजपासून मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी २८ राजकीय पक्ष एकवटले असून ६३ प्रतिनिधींसह ११ मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मात देण्यासाठी ही बैठक होणार आहे. दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी जाहीर केले आहे की, त्यांचा पक्ष सत्ताधारी आघाडी रालोआ किंवा मोदी विरोधकांसोबत लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही.

बीएसपी प्रमुख मायावती यांनी ट्विट करत जाहीर केले आहे की त्यांचा पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रालोआ किंवा मोदी विरोधी पक्षासोबत कोणत्याही प्रकारची युती करणार नाही. त्या एकट्याच निवडणूक लढवणार आहेत. असे वक्तव्य करत त्यांनी ‘एकला चालो रे’चा नारा दिलेला आहे.

मायावती पुढे असं ही म्हणाल्या की, ” रालोआ आणि मोदी विरोधक पक्ष हे बहुतांशी गरीब विरोधी, जातीवादी, धना सेठ समर्थक आणि भांडवलशाही धोरणे असलेले पक्ष आहेत. बहुजन समाज पक्ष त्यांच्या धोरणांविरोधात सतत लढत आहे. त्यामुळे त्यांचा मोदी विरोधी पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version