‘पहाटेचा शपथविधी उद्धवना धडा शिकवण्यासाठी’

‘पहाटेचा शपथविधी उद्धवना धडा शिकवण्यासाठी’

राज्यात अजून देखील २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीवरून विविध दावे केले जात आहेत. आता राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे शपथविधीच्या चर्चाना उधाण आले आहे. यापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचाच हात होता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्यावेळी ती चर्चा चांगलीच रंगली होती. आता सुधीर मुनगंटीवार यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असे सांगितले आहे. यामुळे राजकीय चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले,

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली. परंतु त्यानंतर विश्वासघात केला. यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गनिमी कावा केला होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version