बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव येथे नवरदेवाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने माटरगावात दंगल उसळली आहे. दोन भिन्न समाजामध्ये हा राडा झाला असून या राड्यात डीजे आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
राड्यामध्ये तीन जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील परस्परविरोधी तक्रारीवरून जलंब पोलिसात तब्बल ५४ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकार रात्री दरम्यान घडला असून पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माटरगाव गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मशिदी समोर हा संपूर्ण राडा झाला आहे. या आधी सुद्धा याच ठिकाणी दोन वेळा दोन गटांमध्ये वाद उफाळलेला होता. जुन्या वादाचीच परिमिती पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. दोन गटातील राड्यामुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.