सेफ्टी टँक सफाई करताना कामगारांचा मृत्यू

सेफ्टी टँक सफाई करताना कामगारांचा मृत्यू

शेळगाव, १२ मे २०२३, प्रतिनिधी : शेळगाव महाविष्णु सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा शेत शिवारात सेफ्टी टँकच्या सफाईचे काम करत असतांना पाच कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना गुरुवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली आहे. बेशुध्द अवस्थेत असलेल्या कामगाराला पुढील उपचारासाठी परळी येथील गीत्ते रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती कळताच सोनपेठ पोलीस घटनस्थळी हजर झाले. जेसीबीच्या साहाय्याने टँकवरील स्लँब फोडुन मृत्यु झालेल्या पाच जणांना बाहेर काढण्यात आले.

मयत झालेले मजूर

  • शेख सादेक( वय ४५)
  • शेख शाहरुख (वय १९)
  • शेख जुनेद (वय २९)
  • शेख नविद (वय २५)
  • शेख फिरोज (वय१९)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version