बारसूबाबत विरोधकांचं राजकारण सुरू

बारसूबाबत विरोधकांचं राजकारण सुरू

कोकणातील बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीवरून सध्या राजकारण फारच पेटले आहे. एकीकडे राज्य सरकार या प्रकल्पासाठी आग्रही आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र या प्रकल्पाला विरोध करत आहेत. यावरूनच भाजप आमदार नितेश राणे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. बारसूच्या मुद्द्यावरून विरोधक राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

बारसूमध्ये सध्या केवळ माती परीक्षण सुरू आहे. त्यानंतर त्याचा अहवाल केंद्रात जाईल, आणि मग त्यावर निर्णय होईल. असे असतानाही विरोधक आताच हा प्रकल्प ग्रामस्थांच्या मुळावर आल्याचा सूर आळवत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे. हे या प्रकल्पाचे राजकारण नाही तर काय आहे, असा सवालही त्यांनी केला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version