राहुल गांधी यांची याचिका फेटाळली

राहुल गांधी यांची याचिका फेटाळली

काँग्रेसने नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण सूरत कोर्टने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे.

मोदी आडनावावरून केलेल्या टिपण्णीप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे राहुल गांधींना तुर्तास खासदारकी मिळणार नाही.

२०१९ मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने २३ मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. खासदारी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या शिक्षेप्रकरणी सूरत कोर्टात आव्हान दिलं. परंतु, सुरत कोर्टाने त्यांची याचिकाच फेटाळून लावली आहे. सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता हायकोर्टात दाद मागणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version