अजित पवारांनी राऊतांना खडसावले

अजित पवारांनी राऊतांना खडसावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुरू असलेल्या चर्चांवर मंगळवारी सायंकाळी प्रतिक्रिया दिली आहे. पाच ते सहा तास सुरू असलेल्या चर्चांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत असताना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे तुम्हाला कोणी वकील पत्र दिले ? आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला ? असे सवाल उपस्थित करत नाव न घेता अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यात सुरू असलेल्या चर्चा आणि त्यावर संजय राऊत यांनी केलेले भाष्य बघता अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांचे नाव न घेता आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी वकील पत्र दिले आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

यावर प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले,
आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे काम आमचे प्रवक्ते करतील. इतरांनी त्यावर बोलू नये. इतर पक्षाचे प्रवक्ते बनू नका असा सल्ला देत अजित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. ‘कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही’.

‘आजही नेहमीप्रमाणे आमदार भेटायला आले होते. आमदारांची वेगवेगळी कामं होती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version