कोकणात अद्यापही शिमगोत्सवाची धूम

कोकणात अद्यापही शिमगोत्सवाची धूम

ही पालखी गावातील प्रत्येक अंगणात खेळवली जाते, त्यानंतर तिची घरात पुजा अर्चा केली जाते. या पालखीचं वैशिष्ठ म्हणजे अबाल-वृद्धांपासून घरातील महिलाही पालखी खेळवतात, मुंबईतील चाकरमानीही या पालखीचा मनमुराद आनंद घेतात. पालखी खेळवताना एक वेगळाच आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे जणू काय दिवाळीच. शिमगोत्सावातील पालखीची प्रत्येकाला ओढ लागलेली असते. कधी पालखी आपल्या घरात येते आणि ती आपल्या खळात म्हणजे अंगणात खेळवली जाते. पुढील १० ते १५ दिवस रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम अशीच पाहायला मिळणार आहे.

दरम्यान पालखी खेळवल्यानंतर गावातील मुलं धुळवड साजरी करतात. यात एकमेकांना रंग लावून पारंपरिक ढोल-ताश्यावर नृत्य करतात. यात महिलाही सहभागी होतात. गावातील प्रत्येक घरात पालखी खेळवल्यानंतर अखेर रात्री पालखी मांडावर बसवली जाते. यावेळी दशावतार म्हणजेच नमन बघायला गावकरी गर्दी करतात. नमन झाल्यानंतर पालखीसमोर मानकरी गाऱ्हाणं घालतात आणि पालखी पुन्हा आपल्या जागेवर विराजमान होते. अशाच प्रकारे कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version