‘आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे’

‘आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे’

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केला खरा पण अजूनही मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झालेला नाही. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या पदरी काहीच न पडल्यामुळे अजूनही ते वेटिंगवर आहे, अशातच बच्चू कडू यांनी आम्ही गद्दारी केली, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, अशी इच्छाच बोलून दाखवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या पदरी काहीच न पडल्यामुळे अजूनही ते वेटिंगवर आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीचीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, त्यांच्या मनातली गोष्ट त्यांनी एका जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात बच्चू कडूंनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आपला मातीतला पक्ष, लोक म्हणतात गद्दारी केली पण आम्ही स्वतंत्र आहोत, कुणासोबतही जाऊ, जसं तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं तसंच आम्हालाही मुख्यमंत्री बनायचंय, असं बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, यापूर्वीही बच्चू कडूंनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version