इम्तियाज जलील यांच्या विरोधात भाजप आक्रमक

इम्तियाज जलील यांच्या विरोधात भाजप आक्रमक

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या 3 दिवस एमआयएमतर्फे छत्रपती संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद नामांतर व्हावे यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

याला विरोधम्हणून भाजपने देखील छत्रपती संभाजीमहाराज चौक इथे एमआयएमच्या विरोधात आज जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी खासदार इम्तियाज़ जलील यांची पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे यांच्या नेतृत्वात आज शहरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकात खासदार जलील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, मुर्दाबाद- मुर्दाबाद इम्तियाज जलील मुर्दाबाद, नही सहंगे नही सहंगे दादागिरी नही सहंगे, इम्तियाज जलील यांचं करायचं काय खाली मुंडके वरती पाय, अशा घोषणा देण्यात आल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version