वरळी जांभोरी मैदानावर उद्धव गटाचा निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी सरकारला हलवून टाकणार असल्याचा निर्धार ठाकरे यांनी केला. ते सतत दिल्लीकडे काहीतरी मागत असतात. आता ते ठाकरे आडनाव मिळेल का, अशी विचारणा करीत असतील, असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लागावला.
एकनाथ शिंदे गटातील नेते आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये निवडणूक लढवण्यावरून आव्हान- प्रतिआव्हाने देण्यात आली होती. शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानात रविवारी कार्यकर्त्यांचा ‘निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. हिम्मत असेल तर वरळीतून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी “मुख्यमंत्र्यांनी काम कसं करायला हवं हे आपण जगाला दाखवले. आशिया खंडातील वरळीचा कोळीवाडा हे पहिलं उदाहरण आहे, माहिती नसताना कोविड काळात सर्व मदत लोकांचा घरोघरी पोहोचवली, मंत्रिमंडळ विस्ताराआधीच सरकार कोसळणार असे म्हणत हे घटनाबाह्य गद्दारांचे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार,” असा विश्वासही यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी, विधान परिषद आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे आणि स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.