कसबापेठ – चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी

कसबापेठ – चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी

पुणेकरांसाठी रविवारचा दिवस महत्त्वाचा आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. कसबा हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेले ३० वर्षे कसब्यावर भाजपचं वर्चस्व राहिलंय. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं औत्सुकाचे ठरणार आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने या निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रविवारी पोटनिवडणूक होणार आहे. रविवारी दोन्ही मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. त्यामुळे किती मतदार मतदानासाठी येतात याची उत्सुकता आहे. कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे.

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्याला खिंडार फोडण्यासाठी महाविकास आघाडीने प्रचारात शक्तिपणाला लावली होती. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांची लढत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्याशी होत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version