नांदेड – पुणे प्रवास इतक्या तासात

नांदेड – पुणे प्रवास इतक्या तासात

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदेडमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर विविध विकासकामांचे भुमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रम सोहळा पार पडला. नांदेड – रत्नागिरी महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नांदेडसह ११ जिल्हे या महामार्गाला जोडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ३० हजार कोटींचा हा प्रकल्प असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला हा रस्ता जोडणार आहे.

नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नांदेडसह ११ जिल्हे या महामार्गाला जोडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या प्रकल्पाला ३० हजार कोटी रुपये इतका खर्च होणार असून हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं आहे.

नांदेड, परभणी, जालन्याचा महामार्ग पुर्ण झाला, की नांदेड ते पुणे या शहरातील अंतर आता अवघ्या साडेतीन तासांत कापता येणार आहे, असा सुखद दिलासा गडकरींनी दिला आहे. यामुळे दोन्ही शहराच्या दळणवळणाला मोठी गती येणार असल्याचंही गडकरी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version