‘पालिका अर्थसंकल्पात नवीन योजना नकोत’

‘पालिका अर्थसंकल्पात नवीन योजना नकोत’

आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना अर्थसंकल्पाच्या बाबतीत एक पत्र पाठवले आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत प्रशासक या नात्याने पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल सादर करणार आहेत. या पत्रात त्यांनी एक मुंबईकर या नात्याने नवे प्रकल्प हाती न घेण्याच्या तसेच सुरु असलेल्या प्रकल्पांना निधी द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच सध्या सत्ताधाऱ्यांना महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या नाहीत. प्रशासनचा कारभार हा निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय सुरु आहे, ही गोष्ट फक्त आणि फक्त मुंबईचे खच्चीकरण करण्याच्या हेतूने करण्यात येते आहे. वास्तविक पाहता ही धक्कादायक बाब असून लोकशाहीला संपवण्याचा पाया रचला जात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबई महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कालावधी संपल्याने पालिकेचा कारभार प्रशासक पाहत आहेत. तब्बल ३८ वर्षांनंतर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. ७ मार्च २०२२ पासून आयुक्त चहल प्रशासक म्हणून पालिकेचा कारभार हाकत आहेत .तर सध्या पालिकेत लोकप्रतिनीधी नसल्याने आयुक्तांनी केवळ हंगामी अर्थसंकल्प मांडावा, पालिका निवडणूका पार पडल्यानंतर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला जावा अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आता आयुक्तांनाच पत्र लिहून अर्थसंकल्पाच्या बाबतीत काही सुचना केल्या आहेत. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘एक मुंबईकर म्हणून मी महानगरपालिकेला प्रस्तावित करू इच्छितो की, प्रशासकाने अर्थसंकल्पात सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यात यावा, परंतु मुंबईचे निवडून आलेले प्रतिनिधी – नगरसेवक, महापौर आणि समिती प्रमुखांच्या अनुपस्थितीत कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेतले जाऊ नयेत. निवडून आलेले प्रतिनिधी, आणिबाणीची परिस्थिती नसल्याने पालिकेचा निधी नव्या प्रकल्पांवर खर्च करणे चुकीचे असून हे आपल्या लोकशाही मूल्यांच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version