राज्यात सध्या शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार असा दावा ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आता भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
मंत्री सुधीर मुनगंटीवार हे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, जर शिंदे- फडणवीस सरकार फेब्रुवारीनंतर टिकलं तर राज्यसभेचा राजीनामा देणार का? ज्या लेखणीने तुम्ही सामना पेपरमध्ये लिहिता. त्याच लेखणीने एक वाक्याचा राजीनामा तुम्ही देणार का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना विचारला आहे. तसेच आम्ही त्यांना आणखी मुदत वाढवून देतो. फेब्रुवारी नाही तर 15 मार्चपर्यंत मुदत देतो. 15 मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा. सरकार फेब्रुवारीनंतर टिकलं तर राज्यसभेचा राजीनामा देणार का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
कार्यकर्ते टिकत नाही. त्यामुळे न पटणारी विधान ते करीत आहेत. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तुमच्याकडे ताकद असेल शक्ती असेल, तसेच तुम्ही स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा सांगणारे असाल तर 15 मार्चपर्यंत सरकार पाडा असे आव्हान मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.