अजित पवारांच्या विरोधात राज्यभरात भाजप आक्रमक

अजित पवारांच्या विरोधात राज्यभरात भाजप आक्रमक

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केलं होत.त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं असून आता भाजप चांगलचं आक्रमक झाला आहे. अजित पवारांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात अनेक जिल्ह्यांत भाजपाकडून आंदाेलन करण्यात आले आहे.

दरम्यान याच वक्तव्यावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच ठाणे, दादर या सोबतच भाजपचे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. अजित पवार यांनी 24 तासांच्या आत माफी मागावी अशी मागणी भाजप मार्फत करण्यात येत आहे.

अमरावती व बारामतीतही केले कार्यकर्त्यांनी आंदोलन अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात घोषणाबाजी करत निषेध केला जात आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या फोटोला चपला मारून, बॅनर फाडून निषेध करण्यात आला.बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. पुण्यात हि अजित पवार यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version