वसाहती गृहे की कारागृहे ?

वसाहती गृहे की कारागृहे ?

निकृष्ट दर्जाजे जेवण, साहित्याचा अभाव, दूषित व उन्हाळ्यात गरम पाणीपुरवठा आणि सर्वत्र घाणच घाण, ही बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील शासनाच्या वसाहतीगृहांची स्थिती आहे. हे वसाहती गृहे पाहिले की, येथे माणसेच राहतात का असा प्रश्न पडतो.
या वसाहतीगृहामध्ये निर्वाह भत्ता, मोफत नाश्ता, भोजन, वह्या-पुस्तके, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, शैक्षणिक सहल इत्यादी सुविधा मोफत पुरवण्याचा शासनाचा नियम फक्त कागदावरच दिसून येत आहे. याठिकाणची परिस्थिती पाहता हे वसाहती गृह आहे की कारागृह असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही

हा सगळा प्रकार मलकापूर तालुक्यातील शासकीय आयटीआय कॉलेज च्या वसाहती गृहात आढळून आला आहे. या कॉलेजमध्ये जवळपास ३०० विद्यार्थी आहेत त्यापैकी १४ विद्यार्थ्यांना ये जा करणे परवडत नसल्याने हे सर्व विद्यार्थी या शासकीय आयटीआय कॉलेज च्या वसाहती गृहात जवळपास दोन वर्षांपासून राहत आहेत, या ठिकाणी राहत असलेले सर्व विद्यार्थी हे बाहेर गावातून आलेले आहेत, तर या वसाहतीगृहात दोन वर्षांपासून राहत असलेल्या या विद्यार्थ्यांची हे शासकीय आयटीआय कॉलेज हेळसांड करतांना दिसून येत आहे, इथले जबाबदार शिक्षक भर उन्हाळ्यामध्ये इथे राहत असलेल्या या विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळत असल्याचे समोर आले, इतकेच नव्हे तर या वहसाहतीगृहात तुटलेले दरवाजे बंद पडलेली आरो मशीन व मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य देखील आहे, या वसाहती गृहात साफ सफाई करण्यासाठी सफाई कर्मचारी तर येतात मात्र सफाई करण्यासाठी त्यांना लागणारे साहित्य उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.

याठिकाणचे जबाबदार शिक्षक हे साहित्य उपलब्ध करून देत नसल्याचा धक्कादायक प्रकार ही समोर आला, अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याने हे सर्व विद्यार्थी आता आपापल्या घरी निघून गेले आहेत, या संपूर्ण गंभीर बाबींची आप्पा प्रतिष्ठानच्या वतीने दखल घेण्यात आली आहे, आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांना घेराव घालत या गंभीर बाबींचा जाब विचारण्यात आला असून ,मात्र या शिक्षकांकडे यांच्या एकाही प्रश्नाच उत्तर नव्हते ,या संपूर्ण गंभीर बाबींची मुख्याध्यापक सरांना विचारणा केली असता त्यांनी या ठिकाणी लागणाऱ्या सामग्री करता आम्हाला निधी उपलब्ध होत नसल्याने या अडचणीला आम्हाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version