‘माफी शिवाय अयोध्येत प्रवेश नाही’

‘माफी शिवाय अयोध्येत प्रवेश नाही’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली. त्यानंतर येत्या ५ जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात आले. मात्र उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध वाढला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात वाढता विरोध पाहायला मिळत आहे. राज
ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने उत्तर प्रदेशात रॅली काढण्यात आली आहे.

भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी शक्तीप्रदर्शन करत राज ठाकरेंना कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही असं सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात रणनिती आखण्यासाठी संतांची आणि समर्थकांची बैठक बृजभूषण सिंह यांनी बोलावली आहे.

आजच्या बैठकीला ५० हजार लोकं उपस्थित राहतील असही त्यांनी सांगितलं आहे. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्यांना गुन्हेगार म्हणणाऱ्यांना राज ठाकरे माफी मागत नाही तोवर त्यांना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही असा इशारा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version